रेल्वे मार्ग मोजणीला शेतकर्‍यांची सशर्त परवानगी

26 Sep 2024 16:24:27
 korlai
 
कोर्लेई | रोहा जंक्शन ते आगरदांडा पोर्ट रेल्वेार्गाची संयुक्त मोजणी करुन देण्यास शेतकरी तयार झाले आहेत. मात्र मोजणी झाल्यानंतर शेतकर्‍यांच्या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर काम करु देणार नाही, असा इशारा शेतकर्‍यांनी दिला आहे.रोहा जंक्शन ते आगरदांडा पोर्ट रेल्वेार्गाची मोजणीला शेतकर्‍यांचा विरोध त्यामुळे उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी मुरुड येथे प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना या प्रकल्पाची माहिती दिली.
 
यावेळी नांदले, उसर्डी येथील बाधित शेतकर्‍यांच्या विविध मागण्या व हरकतीवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. तहसीलदार रोहन शिंदे, अदानी पोर्टचे अधिकारी आणि मुरुडचे शेतकरी उपस्थित होते.यावेळी रेल्वे लाईन भूसंपादन संयुक्त मोजणीबाबतची माहिती शेतकर्‍यांना दिली.
 
तसेच मोजणी शेतकर्‍यांच्या मागण्या प्रशासनास सादर केल्या जातील असे आश्वासन उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी दिले. मोजणी झाल्यानंतर जोपर्यंत शेतकर्‍यांच्या मागण्या प्रशासन मान्य करणार नाही, तोपर्यंत कोणतेही अदानी रेल्वे समूहास काम करू देणार नाही असा इशारा शेतकर्‍यांच्यावतीने नथुराम माळी यांनी इशारा दिला आला कि, यावेळी तहसील कार्यालयाचे मंडळ अधिकारी खुशाल राठोड, सपना वायडे, पूजा विरकुड, शेतकरी प्रतिनिधी अंकुश मिसाळ, हरिश्चन्द्र पाटील, रमेश पाटील, अस्लम कादरी व समस्त शेतकरी उपस्थित होते. यावेळी आगरदांडा येथील शेतकर्‍यांनी रेल्वे मार्ग वळविणे बाबत हरकती नोंदविल्या.
 
 
Powered By Sangraha 9.0