बाप्पाच्या स्वागतासाठी कोकण सज्ज ; कोकणवासीय येणार, बंद घरांचे कुलूप उघडणार !

03 Sep 2024 10:24:06
 alibag
 
अलिबाग/बेणसे | कोकणातील सवारचा आवडता सण म्हणजे गणेशोत्सव. अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. सर्वत्र धामधूम सुरू झाली आहे. येथील बाजारपेठा सजल्या आहेत. ओस पडलेली गावं गजबजून जाणार आहेत. बंद घरांचे कुलूप उघडले जाऊन, त्यात चैतन्य संचारणार आहे.
 

alibag  
 
वाडवडिलांचा जिथे वास होता, त्या वास्तूत गणेशोत्सवानिमित्त काही काळ आनंदाचे क्षण घालवणार आहेत. कोकणातील खेड्या- पाड्यातील, वाडीवस्तीवरील बहुसंख्य लोक पुणे, मुंबईसह इतर शहरात स्थलांतरीत झाले आहेत. ती सर्व कुटुंब गणेशोत्सवाला आवर्जून गावी येतात. लहान मुलांना आपल्या गावाची वाट यानिमित्ताने बघायला मिळते. शहरातील चौरस फुटांमध्ये आणि गर्दीच्या रेट्यात श्वास गुदमरुन टाकणारे जीणे जगता जगता, काही काळ त्यांना गावचे घर, सौंदर्याने नटलेल्या निसर्गात मोकळा श्वास घेण्याची अनुभूती मिळते. काही घरं वषारतून एकदा फ३त गणेशोत्सवानिमित्त उघडली जातात. मात्र खरे आनंदाचे क्षण, तर गावाला राहणार्‍या "त्या” वयोवृध्दांचे असतात. गणपतीच्या आगमनाचा आनंद असतोच, परंतू घरचा कर्ता, घरचा ‘लाडका’ येणार याची तसूभर जास्त खुशी यांना असते.
 

alibag  
 
वर्षभर आपली मुलं, नातवंडापासून लांब, गावात एकांतात राहणारे वृध्द या काळात प्रचंड आनंदी असतात. गावापासून लांब रहायला कोणाला आवडेल? पण नाईलाजाने पोटापाण्यासाठी, पोरांच्या भविष्यासाठी गाव सोडावे लागते. त्यामुळे गावाला येतानाचा प्रवास हा ‘स्वर्गसुखा’पेक्षा कमी नसतो. अक्षरश... मिळेल त्या वाहनाने, जमेल तशी सुट२टी घेऊन हे चाकरमानी गावाला येतात. आपल्या गावाकडील कुटुंबासोबत चार दिवस राहतात.
 
बालपणीच्या मित्रांसोबत जुन्या आठवणींमध्ये रमतात. गणरायाच्या स्वागतासाठी सर्वजण तयारीला लागले आहेत. स्थनिक व्यावसायिकदेखील तयारीत आहेत. शोसाठी लागणारी कृत्रिम फळे, हार, सजावटीचे साहित्य अगरबत्ती, धूप आदी वस्तूंची विक्री जोरात सुरु झाली आहे. मखर विक्रेतेदेखील सज्ज झाले आहेत. तसेच छोटे मोठे ढोलकी विक्रेते देखील विक्रीसाठी ढोलकी घेऊन आले आहेत. साऊंड सिस्टीमवाले देखील तयार आहेत. पर्यावरणस्नेही व पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अनेक जण पुढे येत आहेत. त्यामुळे सजावटीसाठी आता कृत्रिम साहित्या व्यतिरि३त शोभिवंत झाडे, फुलझाडे आणि आकर्षक कुंड्यांना विशेष मागणी आहे. त्यामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी रोपवाटिका तसेच फुलविक्रेत्यांची दुकाने सजली आहेत.
 
फुल व पानांची रेडिमेड आरास देखील बाजारात उपलब्ध आहेत. ढोल ताशा पथकांची जोरदार तयारी लहान१/२यांसह तरुणाईमध्ये ढोल-ताशा या पारंपारिक वादनाची मोठी क्रेझ पहायला मिळत आहे. गणेशोत्सवात आपल्या ताल व लयबद्ध वादनाने हे ढोलताशा पथक सगळ्यांच्याच हृदयाचा ठोका चुकवतात. याकाळात ढोलताशा पथकांना खूप मागणी असते. तरुणांसह लहान मुलेदेखील मोठ्या प्रमाणात या पारंपारिक वादनाकडे आकर्षित होत आहेत.
 
Powered By Sangraha 9.0