शिवसेनचा अलिबाग पोलीस ठाण्यावर मोचा ; महिलेवर हल्ल्याच्या निषेधार्थ..

10 Jan 2025 19:01:17
 alibag
 
अलिबाग | तालुक्यातील वायशेत सायमन कॉलनी येथील महिलेवर प्राणघातक हल्ला करणार्‍या हल्लेखोरावर कडक कारवाई करण्यात यावी, या शिवसेना शिंदे गटाकडून गुरुवारी (९ जानेवारी) अलिबाग पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. वायशेत सायमन कॉलनी अलिबाग येथे राहणार्‍या अमिना मन्सुरी आणि सलिम डिगी यांच्यात वाद होता.
 
काही दिवसांपूर्वी असाच दोघांमध्ये वाद झाला. संतापलेल्या सलिमने सदर महिलेवर हल्ला केला. यामुळे तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली. तिच्यावर अलिबाग जिल्हा रुग्णालयात उपचार आहेत. तिची प्रकृती अतिशय गंभीर आहे. या निषेधार्थ शिवसेननेकडून मूक मोर्चाचे आयोजन केले होते.
 
यावेळी तालुकाध्यक्ष अनंत गोंधळी, मुन्ना कोटीयन, महिलाध्यक्ष संजीवनी नाईक तसेच मोठ्याप्रमाणात कार्यकर्ते, व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, सदर इसमाला अटक करण्यात आली असल्याची माहिती अलिबाग पोलीस निरिक्षक साळे यांनी दिली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0