एलिफंटा पर्यटकांची पावले पुन्हा वळली!

11 Jan 2025 18:11:07
 uran
उरण | जागतिक किर्तीच्या एलिफंटा बेटावरील निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी व या ठिकाणावरील लेणी पाहण्यासाठी देश-परदेशातील पर्यटकांची पावले वळली आहेत. त्यामुळे स्थानिक व्यवसायिकांनी समाधान व्यक्त केले आहे. एलिफंटा बेटावर मुंबई शहरातून गेट वे आँफ इंडिया, उरण शहरातील मोरा बंदर तसेच जेएनपीए बंदर, न्हावा गावातून, नवी मुंबई ही जात येत आहे.
 
१८ डिसेंबर २०२४ रोजी मुंबईत गेट वे ऑफ इंडियाच्या समुद्राजवळ एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट बुडाली. प्रवासी बोट बुडाल्याने एलिफंटा बेट चर्चेत आले. एलिफंटा हे भर समुद्रात असलेले मुंबई जवळचे सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. मुंबईतील घारापुरी लेणी ही एलिफंटा नावाने ओळखली जाते.
 
एलिफंटा (घारापुरी) बेटावर डोंगरात लेण्या खोदलेल्या आहेत. एलिफंटा बेटावर जाण्यासाठी बोटी शिवाय पर्याय नाही. गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटाला जाण्यासाठी बोटी सुटतात. फक्त गेट वे ऑफ इंडियाच नाहीच तर आणखी काही पर्यायी मार्ग आहेत. त्यातील उरण शहरातील मोरा बंदर तसेच जेएनपीए बंदर, न्हावा गावातून, नवी मुंबई शहरातून ही जात येत आहे. एकंदरीत या नववर्षाच्या सुरुवातीलाच एलिफंटा बेटावर पर्यटकांची संख्या वाढत असल्याने स्थानिक व्यवसायिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0