रोहा | रोहा तालुक्यातील अकरा वर्षीय बालिकेवर झालेल्या अत्याचारामुळे जिल्हा हादरुन गेला आहे. या घटनेनंतर महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्यानंतर हमी मंत्री भरत गोगावले यांनीही पिडीत मुलीच्याकुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी चुकीला माफी नाही, असे म्हणत गोगावले यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना फोन करुन सदर प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालविण्याची मागणी केली.
वरसे ग्रामपंचायत हद्दीत ११ वर्षीय बालिकेवर एका नराधमाने अत्याचार केल्याची घटना समोर आल्यानंतर रोहेकर प्रचंड संतप्त झाले. रस्त्यावर उतरुन या घटनेचा निषेध केला. तसेच आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी केली. याप्रकणी अत्याचार करणार्या नराधमाच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या असून त्याच्या दोन भावांनादेखील बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
याप्रकाराची दखल घेत राज्याच्या महिला व बालकल्याणमंत्री अदिती तटकरे यांनी पिडीत मुलीच्या कुटूंबाची भेट घेतली होती. गुरुवारी ९ जानेवारी रोजी मंत्री भरत गोगावले यांनीदेखील पिडीत कुटुंबांची भेट घेतली. सदर घटना घृणास्पद असून चुकीला माफी नाही, नराधमाने केलेल्या कृत्याची त्याला शिक्षा होईल, असा विश्वास त्यांनी दिला. यानंतर गोगावले यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावत, हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून नीच कृत्य करणार्या नराधमाला कठोर शिक्षा व्हावी, ही अशी मागणी केली.