पेण | पाली-खोपोली मार्गावर शनिवारी पहाटे अज्ञात वाहनाने रिक्षाला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. रात्रपाळी करुन चालक महेश खरात (रा.कळंब ता.सुधागड) हे रिक्षाने घरी जात होते. दुरशेतजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या रिक्षाला जोरदार धडक दिली.
या अपघातात रिक्षामधील ज्ञानेश्वर घोगरकर आणि अजित हरिश्चंद्र वाघमारे (रा.घोडपापड जांभूळपाडा) या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर रिक्षाचालक महेश खरात हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दोन्ही मृतांचे मृतदेह खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले असून पुढील तपास खालापूर पोलीस करीत आहेत.
अजित वाघमारे यांची दोन लहान आहेत तर रामदास घोगरकर हा एकुलता एक मुलगा असल्याने नातेवाईकांनी तपासाची मागणी केली आहे. या मार्गावर विशेष म्हणजे अॅम्ब्युलन्स उपलब्ध नसल्याने खोपोलीवरुन अॅम्ब्युलन्स सेवा उपलब्ध होते. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या १०८ अॅम्बुलन्समधून जखमी ड्रायव्हरला पुढील उपचारासाठी एमजीएम रुग्णालय पनवेल येथे पाठवले गेले.