जासई उड्डाण पुलावर अपघात; ३ जण जखमी

13 Jan 2025 18:45:00
 uran
 
उरण | तालुयात अपघाताची मालिका सुरूच आहे. तालुयातील जासई येथील उड्डाण पुलावर काल सायंकाळच्या एका मोटारसायकल डंफरमध्ये अपघात घडला. यामध्ये मोटारसायक लवर तिघेजण असल्याचे समजते. अपघातातील आयान गफान नेरकर हा तरुण गंभीर जखमी तर इतर दोघेजण ही जखमी झाले असून त्यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरू आहेत.
 
उरण तालुयातील जासई उड्डाण पुलावर शुक्रवारी, १० जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास डंपर व मोटारसायकलस्वार यांची जोरदार झाली. या अपघातात मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाला आहे. इतर दोघेही जखमी आहेत. उरणमध्ये सुसज्ज हॉस्पिटल नसल्याने जखमींना इतर हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले.
 
अपघात झाल्यानंतर उड्डाण पुलावरून जाणार्‍या प्रवाशांकडून तातडीने मदत मिळाली. मोटारसायकलस्वार आयान गफान नेरकर यांना वाशी येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. इतर दोघांना उलवे नोड येथील हॉस्पिटलला दाखल केले असल्याचे समजते. जखमी आयान नेरेकर हा एसआईएस नेरुळ कॉलेजचा विद्यार्थी आहे. अपघात झाल्यानंतर घटनास्थळी उरण वाहतूक पोलीस व वाहतूक पोलीस निरीक्षक अतुल दहिफळे दाखल झाले. पुढील तपास उरण पोलीस स्टेशन करीत आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0