पनवेल | विनातिकीट महिला प्रवाशाची टीसीला मारहाण

13 Jan 2025 19:04:08
 panvel
पनवेल | विनातिकट रेल्वेने प्रवास करणार्‍या महिलेकडे तिकीटाबाबत केल्याने संतप्त झालेल्या महिलेने, महिला टीसीचे केस पकडून मारहाण तिला बेदम मारहाण केल्याची घटना पनवेल रेल्वे स्थानकात घडली. सुषमा खेमका असे या महिला टीसीला मारहाण करणार्‍या महिलेचे नाव असून पनवेल रेल्वे पोलिसांनी तिच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणून शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
 
या प्रकरणातील ३८ तक्रारदार महिला तिकीट तपासणीस या पनवेल रेल्वे स्टेशन येथे वरिष्ठ तिकीट निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्या आणि त्यांच्या सहकारी तिकीट तपासणीस रोहा-दिवा मेमो रेल्वे गाडीतून उतरलेल्या प्रवाशांचे तिकीट तपासत होत्या. यावेळी महिला टीसीने २ महिलांकडे तिकीटाबाबत विचारणा केली असता, त्यातील आरोपी महिलेने तिच्याकडे तिकीट नसल्याचे सांगूनतेथून पळून जाण्याचा प्रयत्न त्यामुळे महिला टीसीने तिला अडवण्याचा प्रयत्न केला असता.
 
सदर महिलेने महिला टीसीला शिवीगाळ करुन त्यांच्या हातालाा नखाने ओरखडून त्यांना विरोध केला. यावेळी आरपीएफच्या महिला जवानांनी सदर महिलेला शांत करण्याचा प्रयत्न केल्यानंतर देखील तीने टीसी ऑफिसमधुन बाहेर येऊन महिला टीसीचे केस पकडून मारहाण करत महिला टीसीच्या पोटामध्ये लाथ मारली. यावेळी टीसीने पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.
 
 
Powered By Sangraha 9.0