पोलादपूर | रायगड जिल्ह्यातील गेले कित्येक वर्ष प्रलंबित असणारे शाळांचे ऑडिट यासह भविष्य निर्वाह निधी स्लीपा बाबत शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्यांचा प्रश्न प्रलंबित राहिला होता. मात्र, लेखाधिकारी शिवदास पोटे यांनी वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक अलिबाग पदभार स्वीकारल्यानंतर तात्काळ जिल्ह्यातील शिक्षक सेवकांचे प्रलंबित प्रश्न व समस्या सोडविण्याचा निर्णय घेऊन प्रत्येक तालुयात कॅम्प घेत शाळांची ऑडिट व भविष्य निर्वाह निधीचा हिशोब कर्मचार्यांना देण्यासाठी कॅम्पचे आयोजन केले.
याअनुषंगाने पोलादपूर येथे लेखापरीक्षण शिबिर आयोजित करून शाळांची ऑडिट व भविष्य निर्वाह निधी च्या स्लिपा कर्मचार्यांना देण्याबाबत शिबिर आयोजित करण्यात लेखापरीक्षण टीममध्ये लेखाधिकारी तथा वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक अलिबागचे अधीक्षक शिवदास पोटे, सहाय्यक लेखाधिकारी वायळ, सहाय्यक लेखाधिकारी थवई, वरिष्ठलिपिक संतोषकुमार लाड, कनिष्ठ लिपिक नीलमवार, चाळके, माळी आदी उपस्थित होते. यावेळी पोलादपूर तालुयातील धारवलीचे डॉ. आशिष जैतपाल लिखित विचार विमर्ष पुस्तक भेट देऊन मान्यवरांचे स्वागत केले.