भेसळयुक्त धान्य विक्री व्यापार्‍यांनी रोखली , तूरडाळ, बासमती तांदूळची विक्री

13 Jan 2025 16:41:57
KARJT
 
कर्जत | कर्जत येथे दहिवली नाका येथे एका टेम्पो मधून आणालेली तूरडाळ तसेच बसमटू तांदूळ यांची काही दिवसांपासून विक्री सुरु होती. याबाबत माहिती मिळताच कर्जत शहरातील व्यापार्‍यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले तर लाख असलेली तूरडाळ आणि बनावट बासमती तांदूळ यांची विक्री होत दरम्यान, त्या विक्रीसाठी कोणत्याही प्रकारचे शासकीय परवाने त्या दोन तरुणांकडे याव्यात आणि त्यामुळे परप्रांतीय असलेल्या त्या दोन्ही तरुणांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
 
कर्जत शहरातील दहिवली येथील छत्रपती संभाजी महाराज चौकाच्या बाजूला असलेली मोकळ्या जागेत टेम्पो उभा करून त्यात आणलेली तूरडाळ आणि बासमती उच्च दर्जाचा तांदूळ यांची विक्री केली जात परप्रांतीय असलेले दोन तरुण गेली काही दिवस टेम्पो एम एच ०३, ईजी ६१८२ या गाडीमधून आणलेले तूरडाळ आणि बासमती तांदूळ कमी किमतीत मिळत असल्याने ग्राहकांची गेली काही दिवस त्या ठिकाणी वस्तूंची खरेदी करण्यासाठी गर्दी होत होती.
 
त्याची खबर कर्जत शहरातील मोठ्या घाऊक व्यापार करणार्‍या व्यापार्‍यांना देखील लागली होती. आज व्यापारी त्या ठिकाणी पोहचले तर हिंदी भाषेत संवाद साधणार्‍या त्या दोन तरुणांकडे असलेली तूर डाळ हि लाख असल्याचे पाहून व्यापार्‍यांनी कर्जत पोलिसांना कळविले. त्याचवेळी त्या टेम्पो मध्ये असलेले बासमती तांदूळ हे देखील बनावट असल्याचे आढळून आले.
 
कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस त्याच ठिकाणी पोहचले आणि त्यांनी त्या ठिकाणी तूरडाळ आणि तांदूळ यांची विक्री करणार्‍या दोन्ही तरुणांकडे त्या तूरडाळ विक्रीचे परवाने मागितले,खरेदी केल्याची पावती मागितली तसेच धान्य वितरण करण्याचा परवाना मागितला. मात्र त्यापैकी एकही वस्तू परप्रांतीय तरुणांकडे नव्हती. शेवटी त्या दोन्ही तरुणांनी त्यांच्या टेम्पोसह कर्जत पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
 
कर्जत शहरातील व्यापार्‍यांच्या समयसूचकतेमुळे कर्जत दहिवली येथे सुरु असलेली बनावट तूरडाळ बासमती तांदूळ यांची विक्री करणार्‍यांवर धाड टाकली आणि त्यांचा गोरखधंदा उघडकीस आणला. त्याबाबत कर्जत शहरातील व्यापारी यांनी तेथे विक्री होत असलेली तूरडाळ नसून ती लाखेची डाळ आहे. केंद्र सरकारने लाखेची डाळ विकण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे लाखेची डाळ खुल्या बाजारात विकण्यास बंदी असताना आणि अन्न औषध प्रशासनाचे कोणतेही परवाने देखील विक्री केली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले.
कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा ...
बनावट तूरडाळ आणि बासमती तांदूळ यांची विक्री करणार्‍या व कर्जत व्यापार्‍यांनी पकडून दिलेल्या त्या दोन तरुणांवर कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. त्यात कर्जतच्या व्यापार्‍यांनी त्या डाळींबद्दल भाष्य केल्याने पोलिसी कारवाई होऊ शकली
Powered By Sangraha 9.0