रोह्यातून २१ वर्षीयतरुण बेपत्ता

14 Jan 2025 19:23:29
 roha
 
रोहा अष्टमी | आजारी असलेल्या आजीला बघण्यासाठी अष्टमी येथे आलेला २१ वर्षीय तरुण रोहे शहरातून बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या आजीने रोहा पोलीस ठाण्यात दिली आहे.
 
लक्ष्मी मनोहर मोरे ७० वर्षीय आजीचे नाव असून ती अष्टमी रेल्वे स्टेशनशेजारी राहत असून आजी सतत आजारी पडत असल्यामुळे पुणे जिल्ह्यातील ता. दौड (बारामती), येथील यवत या गावात राहणारा नातू चेतन शिंदे हा डिसेंबर महिन्यात रोह्यात आजीकडे आलेला.
 
यादरम्यान, १६ डिसेंबर २०२४ रोजी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास बाथरूमला जाऊन येते सांगून असे तो निघून गेला. त्याचा सर्वत्र शोध घेतला असता तो कोठेही सापडला नाही. याविषयी रोहा पोलीस ठाण्यात मनुष्य मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक देविदास मुपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एस. आर. सकपाळ करित आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0