महाड | महाड तालुक्यातील मोरांडेवाडी पिंपळदरी येथे गायीच्या वासरावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. मानव जातीला काळीमा फासणार्या या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात असून, याप्रकरणी नराधमाला अटक करण्यात आली आहे. १२ रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
महाड तालुक्यातील भावे येथील मोरांडेवाडी पिंपळदरी येथे राहणार्या फिर्यादी यांच्या जनावरांच्या गोठ्यात प्रवेश करत, या नराधमाने गायीच्या वासरावर अनैसर्गिक अत्याचार केले. हे विकृत कृत्य करीत असताना, रंगेहाथ सापडल्यानंतर फिर्यादी यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली.
त्यामुळे या नराधमाने शेकोटीतील जळते लाकूड त्यांच्या फेकण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात सदर इसमाविरोधात प्राण्यांना क्रुरतेने वागविण्यास प्रतिबंध करणेबाबत अधिनियम १९६० चे कलम ११(ए), ११ (बी), भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३२६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून १२ जानेवारी रोजी सायंकाळी पावणेसात वाजता त्याला अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस सुर्वे करीत आहेत.