अपघातग्रस्तांना मदत करणार्‍यांना २५ हजारांचे बक्षीस , केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींची घोषणा

16 Jan 2025 12:37:37
 alibag
 
अलिबाग | नागपूरमधील एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी एक मोठी घोषणा केली आहे. रस्ते अपघातामध्ये जखमी झालेल्यांना मदत करणार्‍या व्यक्तींना २५ हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. सध्या अशा व्यक्तींना दिल्या जाणार्‍या बक्षिसापेक्षा ही रक्कम पाच पटीने अधिक आहे.
 
बोलताना, सध्या अपघातग्रस्त लोकांच्या मदतीसाठी पुढे येणार्‍यांना पाच हजार रुपयांचे बक्षीस दिले जाते. मात्र अपघातानंतरच्या पहिल्या तासाभरात जखमींना रुग्णालयात दाखल करणार्‍यांना अधिक बक्षिस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. तसेच अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींवर पहिल्या सात दिवसांमध्ये जे उपचार केले जातील त्याचा खर्च सरकार करणार आहे.
 
alibag
 
यासाठीही मर्यादा दीड लाखांपर्यंत असून दीड लाखांपर्यंतचे उपचार मोफत केले जाणार आहेत. गडकरींनी या कार्यक्रमात बोलताना, "केवळ राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांमध्ये जखमी झालेल्यांसाठी ही योजना नाही तर राज्य महामार्गांवर अपघातात जखमी झालेल्यांनाही आर्थिक मदत केली जाणार आहे,” अशी माहिती दिली.
 
अपघाग्रस्तांना मदत करणार्‍यांसाठी ऑक्टोबर २०२१ पासून रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून नवीन धोरण लागू करण्यात आले आहे. भीषण अपघातामधील जखमींना तातडीची मदत करुन त्यांचे प्राण वाचवणार्‍यांना, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करणार्‍यांना या योजनेंतर्गत बक्षीस स्वरुपात ठराविक निधी दिला जाणार असे निश्चित करण्यात आलेले. तेव्हा ही रक्कम ५ हजार रुपये इतकी होती. ज्यामध्ये आता वाढ करुन ती २५ हजार इतकी करण्यात आली आहे.
कोण असतो गुड स्मार्टीयन?
केंद्र सरकारच्या या मदतनीसांना आर्थिक स्वरुपाची शब्बासकीची थाप देण्याच्या योजनेला गुड स्मार्टीयन असे नाव देण्यात आले आहे. "चांगल्या विचाराने आणि कोणत्याही मोबदल्याचा अथवा बक्षिसाचा विचार न करता, कोणतेही खास नाते असताना स्वयंप्रेरणेने पुढाकार घेत अपघातात जमखी झालेल्यांना मदत करतो,” अशी गुड स्मार्टीयनची व्याख्या करण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0