नवीन पनवेल | बारा वर्षांपासून घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश करून राहत असल्या प्रकरणी मोहसीन खोकोन मुल्ला याला पनवेल तालुका पोलिसांनी अटक केली. १२ जानेवारी रोजी पनवेल तालुका पोलिसांना बारवई पूल मांडे वडापाव सेंटर, खानावळे येथे एक बांगलादेशी नागरिक कामासाठी येणार असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलिसांचे पथक त्या ठिकाणी पोहोचले. यावेळी एक इसम वडापाव सेंटर समोर उभा होता. त्याला त्याचे नाव विचारले असता मोहसीन खोकोन शेख (रा. शिवनगर, चांभार्ली मोहोपाडा) असे सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडे भारतीय असल्याबाबतचे कागदपत्र सादर करण्यास सांगितले आणि त्याच्याकडे असलेला मोबाईल फोन चेक केला असता बांगलादेशी कॉलिंग कंट्री कोडने सुरु होणारे संपर्क मिळून आले.
त्याच्याकडे बांगलादेशातून भारतात येण्याचे पासपोर्ट, विजा, जन्म दाखला, इतर कागदपत्र मागितले असता त्यांनी ती दिली नाहीत. त्याच्याकडे आधार कार्ड, मोबाईल फोन, सापडून आला. बारा वर्षांपूर्वी भारत-बांगलादेश सीमेवरील गस्तीवरील पथकाची नजर चुकवून त्याने भारतात प्रवेश केला आणि तो पनवेल- खालापूर परिसरात राहत होता.