मुंबई | प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महा अभियानांतर्गत राज्यातील ७५ ठिकाणी अंगणवाडी केंद्र सुरू करण्यााठी केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे.
महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या प्रयत्नांनी गडचिरोली २५, नांदेड १, नाशिक १२, पालघर १५, पुणे ११, रायगड ५५, रत्नागिरी १०, सातारा २, ठाणे ५, यवतमाळ ९ अशा एकूण ७५ नवीन अंगणवाडी केंद्रांना मान्यता मिळाली आहे. सदर कार्यक्रमांतर्गत राज्यातील अंगणवाडी केंद्र मंजूर करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी संबंधित अधिकार्यांना दिले होते.
या अंगणवाडी केंद्राच्या बांधकामाकरिता केंद्र शासनाकडून प्रति अंगणवाडी रुपये १२ लाख याप्रमाणे १०० टक्के निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहे.