सहा घुसखोर बांगलादेशी महाड एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात

21 Jan 2025 17:20:49
 mahad
 
महाड | महाड तालुक्यातील पिंपळदरी मोरांडेवाडी परिसरात अवैधरित्या वास्तव्य करणार्‍या ५ पुरुष व १ महिला घुसखोर बांगलादेशी एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बांगलादेश सीमेवर चोराटी मार्गाने घुसखोरी करून ते महाड येथे अनधिकृत वास्तव्य करत होते.
 
बांगलादेशातील राजकीय अस्थिरता, गरिबी व उपासमारीमुळे बांगलादेशातील नागरिक सीमेवरील गस्ती पथकाची नजर चुकवून भारतात प्रवेश करतात. बांगलादेशी नागरिकांचा पेहराव व चेहरेपट्टी ही पश्चिम बंगालच्या नागरीकांसारखी असते. त्यामुळे ते सीमावर्ती जिल्ह्यातील असल्याचे भासवितात.
 
तरी, अवैधरीत्या वास्तव्य करणार्‍या बांगलादेशी नागरिकांची माहिती नजीकच्या पोलीस स्टेशन अथवा नियंत्रण कक्ष रायगड येथे द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0