कर्जत | तालुयातील भाकरीपाडा येथे पेण तालुयातील शेतकरी यांनी जमीन भाड्याने घेवून कलिंगड शेती केली आहे.त्या शेतामध्ये असलेले गवत मारण्याचे औषध मारण्यासाठी कीटकनाशक वापरले त्यामुळे कलिंगडाची झाडे सुकू लागली आहेत. दरम्यान, संबंधित कीटकनाशक देणारे कृषी सेवा केंद्राने आपल्या शेतातील झाडे करपल्याबद्दल नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.
पेण तालुयातील हनुमान पाडा गावातील शेतकरी शरद पाटील हे दरवर्षी कर्जत तालुयात कलिंगडाची शेती करण्यासाठी येत असतात. ऑटोबर ते एप्रिल या कालावधीत हे शेतकरी उल्हास नदीवरील पाणी उचलून त्या पाण्याच्या आधारे शेती करीत असतात. त्यासाठी हे शेतकरी स्थानिक शेतकर्यांच्या जमिनी भाड्याने घेतात आणि त्या जमिनीवर कलिंगडाची शेती फुलवतात.
कर्जत तालुयातील भाकरी पाडा गावातील शेतकर्यांची साधारण २० एकर जमीन भाड्याने घेवून ऑटोबर महिन्यापासून कलिंगडाची शेती करण्यासाठी वाफे पाडणे आणि त्यात कलिंगडाची बिया टाकून शेतीला सुरुवात केली.यावर्षी या शेतकर्याने आपल्या शेतात साधारण दहा पेक्षा अधिक किलो वजनाचे फळ होत असलेल्या कलिंगडाची बियाणे आणले आहे.
त्याशिवाय आयशा, सिम्बा आणि मंडाली जातीचे बियाणे यांच्या माध्यमातून २० एकर जमिनीवर कलिंगड पीक घेण्यासाठी शेती केली आहे. गोल्डन तसेच आयशा, सिम्बा आणि मंडाली जातीचे बियाणे त्यांनी पेण येथून खरेदी केली आहेत. त्याचबरोबर १५.१५.१५ जातीचे युरिया सुफला खत आणि कीटकनाशके ही खरेदी करून आणली होती.
मात्र मागील महिन्यात लागवड केलेल्या गोल्डन जातीच्या कलिंगडाचे शेतात मोठ्या प्रमाणात गवत झाले होते. गवतामुळे कलिंगड वाढीस परिणाम होत असल्याने शेतकरी शरद पाटील यांनी नेरळ गावातील कृषी सेवा केंद्रातून कलिंगडाच्या वाफ्यांमध्ये झालेले गवत मारण्यासाठी कीटकनाशक औषध खरेदी केले होते.
औषधाची फवारणी केली असता अगदी दुसर्याच दिवसापासून कलिंगडाच्या झाडाची पाने सुकू लागली.आता त्या शेतातील एक एकराहून अधिक जमिनीवरील झाडे करपून गेली आहेत. त्यामुळे शेतकरी त्यांनी नेरळ येथे जावून कृषी सेवा केंद्राकडे गवत मारण्याचे कोणते औषध दिले होते याचा जाब विचारला. त्यात कलिंगडाची महिन्यांनी फळावर येणारी झाडे कोमेजून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता नव्याने कलिंगडाची झाडे त्या शेतात लावणे शय नसल्याने मोठे आर्थिक नुकसान या शेतकर्याचे झाले आहे.