उरण | उरण तालुक्यातील चिरनेर परिसरातील चिकनची दुकाने ९ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत. घरगुती कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर हीसतर्कता बाळण्यात येत आहे. चिरनेर गावातील काही कोंबड्या मृत पावत होत्या.
त्यामुळे शासनाच्या पशू पालन अधिकार्यांनी भेट देऊन पाहणी केली असता काही कोंबड्यांच्या मृत्यू संशयास्पद वाटले. त्यामुळे कोंबड्यांची तपासणी करण्यासाठी भोपाळ आणि पुणे येथे पाठविण्यात आल्याने असता, कोंबड्यांना बर्ड फ्ल्यू झाल्याचे वैद्यकीय चाचणीतून स्पष्ट झाले. यानंतर पशूवैद्यकीय अधिकर्यानी यांनी १ हजार २३७ पक्षी शास्त्रीयदृष्ट्या नष्ट केले. तसेच १७७ अंडी, २७० किलोग्रॅमचे खाद्य नष्ट केले.
बर्ड फ्लूचा प्रादूर्भाव होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी चिकनची दुकाने ९ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच १ किलोमिटर परिसरातील नागरीकांना घाबरुन न जाता सर्तक राहण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, राज्यात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाला असला तरी तो रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने दक्षतेसंदर्भात उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. आजमितीस राज्यातील कोणत्याही जिल्ह्यांमधून पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लू रोगामुळे मरतूक आढळलेली नाही. त्यामुळे उकडलेली अंडी व शिजवलेले चिकन खाणे पूर्णपणे सुरक्षित असल्याचे आवाहन करण्यात येत आले आहे.