तरुणाचा मृत्यू, ८ जखमी , भोर-वरंधा घाटात कार पाचशे फूट दरीत कोसळली

28 Jan 2025 13:32:32
 
poladpur
 
पोलादपूर | भोर महाड मार्गावरील वरंधा घाटातून महाडकडून भोरच्या दिशेने जाणारी इको कार ५०० फूट दरीत कोसळून अपघात झाला. या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून, ८ जण जखमी झाले आहेत. सोमवारी (२७ जानेवारी) पहाटे चारच्या सुमारास अपघात झाला आहे.
 
शुभम शिर्के (वय २२ जनता वसाहत पुणे) असे मृताचे नाव असून, मंगेश गुजर (वय२६, दत्तवाडी), अशोक गायकवाड (वय २९ रा.भवानीपेठ), सिद्धार्थ गणधने (वय २६ रा.दांडेकर पुल), सौरब महादे (वय २२ रा.पर्वती), गणेश लावंडे (वय२७ रा.धायरी) अभिषेक रेळेकर (वय २५ रा.नारायण पेठ), यशराज ुचंद्रलोकूल (वय २२ घोरपडे पेठ) आणि आकाश आडकर (वय २५ रा. दत्तनगर) अशी जखमींची नावे आहेत.
 
भोर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून स्थानिक व सह्याद्री रेस्क्यू टीमच्या मदतीने जखमींना दरीतून बाहेर काढण्यात आले असून मृतदेह व जखमींना भोर उपजिल्हा रुग्णालयात येथे पाठविण्यात आले आहे. या अपघाताचा पुढील तपास भोर पोलीस करत आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0