माणगाव | माणगाव नगरपालिकेडून बाजारपेठेत अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आली. त्यामुळे बर्याच दिवसानंतर रस्त्यांनी मोकळा श्वास घेतल्याचे चित्र आहे.
माणगावचे मुख्याधिकारी संतोष माळी यांनी ही कारवाई केली. शहरातील विविध भागात ही कारवाई नगरपालिकेकडून करण्यात आली.नगरपालिकेने केलेल्या या कारवाईमुळे फेरीवाल्यांचे धाबे दणाणले असले तरी नागरिकांनी मात्र या कारवाईचे स्वागत केले आहे.