दिघी | श्री क्षेत्र हरिहरेश्वर धार्मिक स्थळी महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांच्या कुटुंबाने रविवारी भेट दिली. विशेष म्हणजे भाविकांच्या गर्दीतल्या रांगेत उभे राहून देसाई परिवाराने दक्षिण काशी तिर्थक्षेत्राचे मनोभावे दर्शन घेतले. श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटनस्थळांना प्रत्येक विकेंडला मोठी गर्दी पाहायला मिळते.
त्यामध्ये हरिहरेश्वर हे पर्यटन व धार्मिक स्थळ म्हणून राज्य देशभरात प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे मंत्री शंभूराजे देसाई यांच्या आई विजयादेवी देसाई व भाऊ रविराज देसाई यांनी अशावेळी कोणत्याही प्रकारे बडेजाव किंवा ओळख न सांगता असलेल्या रांगेतून सर्वसामान्य भविकांप्रमाणे सहकुटुंब दर्शन घेतले. यावेळी देवस्थानचे विश्वस्त आणि पुजारी निनाद गुरव यांनी मंदिराबाबत माहिती दिली. संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला.