पनवेल | चिकनच्या काँन्ट्रीवरुन दोन मित्रांमध्ये जोरदार वाद झाला. या वादातून एकाने दुसर्या मित्राच्या डोक्यात क्रिकेटच्या बॅटने हल्ला केला. यामध्ये जयेश वाघे या तरुणाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी खारघर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. २३ जानेवारी रोजी रात्री साडेनऊ ते पावणेदहाच्या दरम्यान बेलपाडा आदिवासी वाडी, सेक्टर तीन, खारघर येथे जयेश वाघे आणि त्याचे मित्र चिकन बनवत होते.
चिकनसाठी जयेश हा कधीच पैसे देत नाही असे मन्नू दिनेश शर्मा या त्याच्या मित्राने बोलून दाखवले. त्यावरुन या दोन मित्रांमध्ये वाद झाला. या वादातून जयेशने मन्नू यांच्या कानाखाली मारले. याचा राग आल्याने मन्नू याने जयेशला हाताबुक्क्यांनी छातीत आणि पोटावर मारहाण केली.
त्यानंतर, मन्नू याने क्रिकेटच्या लाकडी बॅटने जयेशच्या चेहर्यावर आणि पाठीवर प्रहार केले, ज्यामुळे जयेश गंभीर जखमी झाला. जयेशला एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान जयेशचा मृत्यू झाला. याप्रकारणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी मन्नू शर्मा याला अटक करण्यात आली.