ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंताग्रस्त , कडधान्य पिकासहित आंबा, काजू पिकाचे नुकसान होण्याची भीती

30 Jan 2025 17:57:58
 kolad
 
कोलाड | रोहा तालुयात गेली चार ते पाच दिवस ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे शेतकर्‍यांची चिंता वाढली असल्याचे दिसून येत आहे. यामुळे कडधान्य पिकांसहित आंबा, काजू व इतर फळझाडांचे मोठे नुकसान होण्याची शयता निर्माण झाली असून यामुळे शेतकर्‍यांवर आर्थिक संकट कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
 
गेली चार ते पाच दिवसांपासून वातावरणात बद्दल होऊन ढगाळ वातावरण निर्माण झाला आहे. यामुळे वाल, मटकी, मुग, हरभरा, चवळी, तूर या पिकांना फटका बसण्याची शयता निर्माण झाली आहे. कारण या दिवसात पिकांना सूर्यप्रकाश मिळणे आवश्यक असतो.
 
परंतु ढगाळ वाटतावरणामुळे कडधान्य पिकांची पाने पिवळी पडत चालली असुन त्या पानामध्ये अळी तयार झाली शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच आंबा, काजू, इतर फळझाडे यांचे पिक उत्तम प्रकारे यावे म्हणून बागायतीदारांनी महागडी औषधे यांची फवारणी केली आहे. तसेच बागायतीची मशागत करुन हजारो रुपये खर्च केले आहेत. परंतु निसर्गाच्या बदलामुळे सर्व मेहनतीवर पाणी फेरेल की काय? अशी भीती शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0