रोह्याच्या राज मोरे याची महाराष्ट्र कबड्डी संघात निवड

06 Jan 2025 18:21:13
 roha
 
खांब | रोहाचा अष्टपैलू खेळाडू व रोठ खुर्द गावचा सुपुत्र राज मोरे याची महाराष्ट्र कुमार गट कबड्डी संघात निवड झाली आहे. ८ जानेवारीपासून उत्तराखंड येथे होणार्‍या ५० व्या राष्ट्रीय कुमारगट अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या कुमारगट दाखल होणार आहे.
 
राज मोरे हा जय बजरंग रोहा संघाचा अष्टपैलू खेळाडू आहे. सांगली येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद कुमार गट कबड्डी स्पर्धेत रायगड कुमार गट संघाने तृतीय क्रमांक पटकावला या संघाचे नेतृत्व राज मोरे यांनी केलं होते.
 
या स्पर्धेत रायगड संघाची अतिशय उत्तम कामगिरी राहिली व त्यात राज मोरे याचा सिंहाचा वाटा होता. राजची महाराष्ट्र कुमार गट कबड्डी संघात झालेली निवड कौतुकास्पद मानली जाते.
Powered By Sangraha 9.0