कुंभमेळ्यासाठी महाराष्ट्रातील आयटीयूएस मरीनशी करार

07 Jan 2025 17:32:47
 mumbai
 
मुंबई | महाराष्ट्रातील समुद्री सेवा पुरवठादार आयटीयूएस मरीन कंपनीला उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने कुंभमेळा-२०२५ साठी बचाव पथके आणि उभयचर बोटी उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाचा करार केला आहे. कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठ्या धार्मिक समारंभांपैकी एक आहे, जो जगभरातून लाखो भक्तांना आकर्षित करतो.
 
अशा भव्य सोहळ्यासाठी सुरक्षिततेची जबाबदारी सक्षमरीत्या पार पाडण्यासाठी उत्तर प्रदेश एटीएसने आय टी यू एस मरीनसोबत भागीदारी केली आहे, ज्यामुळे आपत्कालीन परिस्थिती आणि बचाव कार्यांमध्ये चांगले व्यवस्थापन शक्य होईल. या कराराअंतर्गत, आय टी यू एस मरीन उत्तर प्रदेश एटीएसला उभयचर बोटी आणि प्रशिक्षित बचाव पथके उपलब्ध करून देईल, ज्यामुळे गंगा नदीच्या काठावर आयोजित कार्यक्रमामध्ये गर्दीच्या व्यवस्थापन, हवामानातील अनिश्चितता आणि इतर आव्हानांना सामोरे जाण्यास मदत होईल.
 
कुंभमेळा २०२५ दरम्यान उत्तर प्रदेश एटीएसला पाठबळ देणे हे आमच्या क्षमतांचा आणि जिवांची सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या आमच्या दृढनिश्चयाचे प्रतीक आहे. "अशी महत्त्वाची जबाबदारी मिळाल्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो. अशी प्रतिक्रिया आयटीयूएस मरीनच्या प्रवक्त्यांनी सांगितले.
 
कुंभमेळ्याच्या सुरळीत आणि सुरक्षित आयोजनासाठी आय टी यू एस मरीन आपल्या बचाव पथकांचे आणि उपकरणांचे नियोजनपूर्वक स्थानिक अधिकार्‍यांसोबत समन्वय साधून वेळेत तैनात करणार आहे. हा उपक्रम करोडो भाविक आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी सरकारच्या सक्रिय दृष्टिकोनाचे प्रतीक आहे.
 
महाराष्ट्रात मुख्यालय असलेली आय टी यू एस मरीन ही प्रमुख समुद्री सुरक्षा उपाययोजना पुरवठादारकंपनी आहे, जी बचावकार्य, उभयचर तंत्रज्ञान आणि आपत्ती व्यवस्थापन यामध्ये तज्ज्ञ आहे. देशभरातील महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये यशस्वी योगदान देण्याचा अनुभव असलेल्या कंपनीची ओळख नाविन्यपूर्ण दृष्टिकोन, कौशल्यपूर्ण कर्मचारी आणि मजबूत उपकरणे यासाठी आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0