मरुड येथे डोक्यात नारळ पडून इसमाचा दुर्दैवी मृत्यू

07 Jan 2025 17:25:41
 Murud
 
मुरुड | मुरुड समुद्रकिनारी शहाळे खरेदी करण्यासाठी गेले असताना राजपुरी गावातील ४८ वर्षाच्या इसमाचा डोक्यात नारळ पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जयेश पांडुरंग गीते असे या मृत इसमाचे नाव आहे. राजपुरी येथील शिव मंदिरामध्ये अभिषेक पूजेसाठीशहाळे खरेदी करण्यासाठी ते आले असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे.
 
रविवारी, ५ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास मुरुड समुद्रकिनारी श्रीयश रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या चंदन खोत यांच्या शहाळे स्टॉलवरून शहाळे खरेदी करून निघण्याच्या तयारीत असताना येथे असलेल्या ९० फूट उंच नारळाच्या झाडावरून वेगाने नारळ डोक्यात पडल्याने जयेश तिथल्या तिथेच जागीच गतप्राण झाला. या मृत्यूनंतर मुरुडसह राजपुरी गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0