नवी मुंबई | शीव-पनवेल मार्गावर झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. शिवाजी लेंढाळ असे या अपघातात मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शीव पनवेल मार्ग मुंबई दिशेच्या मार्गिकेवर जुई नगर रेल्वे स्टेशन नजीक हा अपघात झाला.
सुपारी साडेतीनच्या दरम्यान भरधाव वेगाने मुंबईकडे जाणार्या डंपर चालकाचे वेगावरील नियंत्रण सुटले त्याने गाडी समोरील एका कारला जोरदार धडक दिली.
अपघातात सर्व गाड्यांचे कमी जास्त नुकसान झाले आहे. अपघात होताच डंपर चालक गाडीतून उडी मारून पळून गेला. त्याचा शोध सुरू आहे. अशी माहिती नेरुळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी यांनी दिली.