अलिबाग | तालुक्यातील आक्षी साखर येथील मासेमारी करण्यासाठी गेलेली बोट बुडाल्याची घटना मंगळवारी घडली. बोटीवरील सर्व १५ खलाशी सुखरुप आहेत. बोटीचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. साखर येथील जगदीश बामजी यांची मच्छिमार बोट मंगळवारी (७ जानेवारी) मासेमारीसाठी समुद्रात गेली होती.
मच्छिमारी करत असताना पहाटे बोटीला अचानक गळती त्यामुळे बोटीत पाणी भरु लागले आणि बोट हळूहळु पाण्यात बुडू लागली. प्रसंगावधान दाखवत बोटीतील खलाशांनी इतर बोटीच्या खलाशांकडे संपर्क साधत सुखरुप किनारा गाठला.
बुडालेल्या बोटीला दुसर्या बोटीने खेचत साखर किनार्यावर आणण्यात आले आहे. बोटीचे सुमारे १२ लाखांचे नुकसान झाले असल्याची माहिती मच्छिमार नाखवांनी सांगितली आहे.