द्रोणागिरी पर्वत वाचवा , करंजा ग्रामस्थांचे वनमंत्री गणेश नाईक यांना साकडे

08 Jan 2025 19:47:56
 uran
 
उरण | करंजा रेवस सेतू द्रोणागिरी पर्वताला पोखरून करण्याचा प्रयत्न शासनाचा सुरू आहे. यामुळे भविष्यात द्रोणागिरी देवीच्या मंदिराला व सुप्रसिद्ध द्रोणागिरी पर्वताला धोका पोहचून अस्तित्व संपुष्टात येण्याची भीती वाटत आहे. धोका न पोहचता करंजा रेवस सेतूची उभारणी करण्याची मागणी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे करंजा ग्रामस्थांनी केली आहे.
 
वनमंत्री गणेश नाईक यांची करंजा ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष कल्पेश थळी, खजिनदार शैलेश डाऊर यांनी भेट घेऊन करंजा रेवस सेतूचे बांधकाम सुरू आहे. परंतु सदरचे बांधकाम हे रामायणातील पौराणिक काळापासून द्रोणागिरी पर्वत सर्वांनाच आहे. अनेक आयुर्वेदिक वनस्पती, औषधी संजीवनी याच डोंगराच्या कडेकपारीमध्ये आहेत.
 
या परिसरात डोंगरदेवी म्हणून प्रसिद्ध पावलेल्या करंजा ग्रामस्थांचे आराध्यदैवत असलेल्या द्रोणागिरी मातेवर भाविकांची श्रद्धा आहे. मात्र या पौराणिक काळातील द्रोणागिरी पर्वताला पोखरून करंजा रेवस सागरी सेतूची निर्मिती करण्याचा प्रयत्न शासनाकडून सुरू असल्याचे निदर्शनास आणून दिले. यामुळे भविष्यात येथील द्रोणागिरी मंदिर व द्रोणागिरी पर्वताचे अस्तित्व नष्ट होण्याची भीती व्यक्त केली. तरी सदरच्या सेतूचे बांधकाम हे सदरच्या दोन्ही वास्तूला हात न लावता करण्यात यावे, अशी मागणी करंजा ग्रामस्थांनी लावून धरली आहे.
 
Powered By Sangraha 9.0