कर्जतकरांवर काळ्या जादुची माया? लोभेवाडी गावावर करणी करण्याचा प्रयत्न; कारवाईची मागणी

08 Jan 2025 18:51:25
 KARJT
 
कर्जत | एकीकडे जादूटोणासारख्या भंपक आणि निरर्थक समजल्या जाणार्‍या गोष्टी असताना कर्जत तालुयातील दुर्गम भागात असलेल्या लोभेवाडी गावाच्या वेशीवर अज्ञातांनी देव देवस्की केल्याचा प्रकार समोर आलाय. गावात जाणार्‍या दोन रस्त्याच्या टोकावर भाज्या, लिंबू, गुलाल आणि त्यात लोखंडी पिळदार पट्टी लावून गावावर करणी करण्याचा हा प्रयत्न केला गेला असल्याचे समोर आले. दरम्यान या प्रकाराने लोभेवाडीतील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.
 
कर्जत पाथरज ग्रामपंचायत हद्दीतील लोभेवाडी येथे रात्रीच्या सुमारास गावात जाण्याच्या रस्त्याच्या वेशीवर मूठभर माती टाकून त्यावर भाज्या, पिळदार लोखंडी पट्ट्या, जीरा, मोहरी, लिंबू सारख्या अनेक वस्तू जमा करून ठेवल्या होत्या. त्या भाज्यांवर गुलाल आणि लिंबू चार कोनात कापण्यात आला होता. ओली माती, बाजूला राख जाळण्याचा प्रकार दिसून येत होता. गावाच्या हा प्रकार अज्ञातांनी केल्याने, सकाळच्या सुमारास बाहेर पडणार्‍या ग्रामस्थांसमोर हा प्रकार उघड झाला.
 
यामुळे येथील काही ग्रामस्थांच्या मनात वेगळेच काहूर माजले. हा प्रकार गावावर काळी जादू करून करणी करण्याचा प्रयत्न केला गेला की गुप्तधन मिळवण्यासाठी करण्यात आला म्हणून बोंब होती. दुसर्‍या बाजूला हा वशीकरण करण्यासाठी केलेला प्रयत्न म्हणून अंधश्रद्धा होती. दरम्यान एकीकडे जादूटोणा यासारख्या गोष्टीत काहीच तथ्य नाही किंवा ह्या गोष्टी भंपक मानण्यासाठी अनेक संघटना, संस्था जनजागृती करीत असताना दुसरीकडे कर्जत तालुयात ह्या गोष्टी सर्रास होत असताना लोभेवाडी येथील या प्रकाराने ग्रामस्थ घाबरून गेलेत.
 
दोन दिवसांपूर्वी याच वाडीच्या नदी तीरी लिंबू कापून त्यावर डोळे काढल्याचा प्रकार होता तर अगोदर काही वर्षापूर्वी लोभेवाडी येथील स्मशानभूमीत अज्ञातांनी दफन केलेला मृतदेह जमिनीवर काढून फुल, गजरा पसरवून मध्यरात्रीच्या वेळी पुजा केली गेल्याचे काही ग्रामस्थ सांगतात. यावेळी येथील बाबा पुजारी पळून गेले.
 
दरम्यान, नरबळीसारखे प्रकरण समोर असताना गावावर कोणी करणी केली नाही ना? म्हणून लोभेवाडीतील ग्रामस्थ भयभीत झालेले आहेत. आजही ग्रामीण भागात अंधश्रद्धाचे जाळे ग्रामस्थांवर पसरलेले आहेत, त्यामुळे ग्रामीण भागात आजही भगताकडे जाणे, जादूटोणा केली म्हणून घरीच बसून राहणे हे या प्रकरणावर विेशास ठेवून असल्याने ग्रामीण भागात जनजागृती होणे गरजेचे आहे तर पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देऊन कारवाई करण्याची गरज आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0