अलिबाग | शहीद सुयोग कांबळे यांना भारतीय सैन्य दलामार्फत मानवंदना

By Raigad Times    09-Jan-2025
Total Views |
 alibag
 
अलिबाग | अलिबाग तालुक्यातील चिंचवली गावचे सुपूत्र शहीद सुयोग अशोक कांबळे यांना १२ जानेवारी रोजी भारतीय सैन्य दलामार्फत मानवंदना व अभिवादन करण्यासाठी सभा आयोजित करण्यात आली आहे.
 
सुयोग कांबळे हे ४ ऑक्टोबर २०२३ रोजी सिक्कीम महापुरात शहीद झाले होते. त्यांना रविवारी, १२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता चिंचवली-नारंगी ता.अलिबाग येथे भारतीय सैन्य दलामार्फत मानवंदना देण्यात येणार आहे.