कर्जत कडाव येथील लाचखोर मंडळ अधिकारी अटकेत , १ लाखाची लाच घेताना रंगेहाथ पकडल

09 Jan 2025 17:20:35
KARJT
 
कर्जत | तालुक्यातील कडाव येथील मंडळ अधिकार्‍याला एक लाखाची लाच घेताना रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक आहे. चंद्रकांत ठकाजी केंडे असे या लाचखोर अधिकार्‍याचे नाव असून तो नागोठणे तालुका रोहा येथील रहिवासी आहे. दहिगाव तालुका कर्जत येथे नोंदणीकृत कराराद्वारे खरेदी केलेले जमिनीचे फेरफार नोंद मंजूर करण्याकरिता ३१ डिसेंबर २०२४ रोजी तक्रारदार यांच्याकडे मंडळ अधिकारी चंद्रकांत ठकाजी केंडे यांनी १ लाख रुपयांची मागणी केली होती.
 
याबाबत ७ जानेवारी २०२५ रोजी रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रार केली होती. त्यानुसार पडताळणी केल्यानंतर बुधवारी ८ जानेवारीला पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाडावे यांनी विनोद जाधव, अरुण करकरे, महेश पाटी, सचिन आटपाडकर, सागर पाटील यांच्या पथकाने सापळा रचला. पडताळणीदरम्यान चंद्रकांत ठाकाजी केंडे यांनी तक्रारदाराकडे जमिनीची फेरफार नोंद मंजूर करण्याकरिता रक्कम रुपये लाखाच्या रकमेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
 
तसेच केंडे यांनी तक्रारदाराकडून १ लाखाची रक्कम स्वीकारली असतात्यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडून ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबाबत केंडेविरुध्द गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे. दरम्यान, ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक संजय गोवीलकर, अपर पोलीस अधीक्षक सुहास यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
 
 
Powered By Sangraha 9.0