अलिबाग येथे विधी साक्षरता शिबीर उत्साहात संपन्न

09 Jan 2025 16:31:25
 alibag
 
अलिबाग | जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जन शिक्षण संस्थान रायगडच्या माध्यमातून कर्मचारी, प्रधानमंत्री विेशकर्मा व आदिवासी विद्यार्थ्यांना विविध योजना व कायदेविषयक जनजागृती माहिती देण्याच्या, तसेच जीवन मूल्य शिक्षण व एम्प्लॉयबिलिटी स्किल देण्याच्या दृष्टिकोनातून जन शिक्षण संस्थान रायगड येथे ८ जानेवारी रोजी सहाण अलिबाग जे.एस. एस. मुख्य कार्यालय या ठिकाणी विधी साक्षरता शिबिर हा उपक्रम राबविण्यात आला.
 
सदर उपक्रमाप्रसंगी कायदेविषयक जनजागृती अधिकार व सन्मानासाठी प्रेरक असल्याचे मत संचालक विजय कोकणे यांनी व्यक्त केले, तर महिला सुरक्षा लैंगिक छळ या वर अ‍ॅड. निलोफर शेख यांनी माहिती दिली, तसेच रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण हे समाजातील दुर्बल व वंचित घटकांना न्याय सेवा देण्यासाठी सदैव तत्पर असल्याचे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष व वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश तथा सचिव अमोल शिंदे यांनी व्यक्त याच उपक्रमाचा भाग म्हणून जन शिक्षण संस्थान रायगडच्या कर्मचारी, प्रधान मंत्री विेशकर्मा व आदिवासी विद्यार्थ्यांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या माध्यमातून कायदेशीर नियमांचे मार्गदर्शन विधी साक्षरता शिबिराच्या माध्यमातून करण्यात आले.
 
याप्रसंगी डॉ. विजय कोकणे (संचालक), प्रणिता मगर व हिमांशू लाड (लेखनिक) जन शिक्षण संस्थान रायगडच्या अकाउंट मॅनेजर प्रतिक्षा चव्हाण, ट्रेड शिकवणारे प्रशिक्षक अस्मिता भोईर, सोनम मोरे व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम उत्साहात पार पडला.
 
 
Powered By Sangraha 9.0