रोह्यात चिमुरडीवर लैंगिक अत्याचार, रोहेकर संतापले ; खटला फास्ट ट्रॅककोर्टात चालविणार

09 Jan 2025 13:18:58
 roha
 
रोहा | रोह्यातील वरसे गावात ११ वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर सर्वत्र संपताची लाट पसरली दोषीला कठोर शिक्षा व्हावी, म्हणून ग्रामस्थांनी मंगळवारी रात्री रोहा पोलीस ठाण्यात जमा होऊन हल्लाबोल करत संताप व्यक्त केला. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह तिघांना अटक केली आहे.
 
बुधवारी (८ जानेवारी) सकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पीडित मुलीच्या घरी भेट देत घटनेबद्दल अधिक माहिती जाणून घेतली. व सदर खटला ट्रॅकवर चालवून आरोपीला कठोर शिक्षा होईल यासाठी नक्कीच प्रयत्न करणार, असे स्पष्ट मत व्यक्त करत जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी आश्वासित केले. तर दुसरीकडे पोलीस अधीक्षक गावात अल्याची माहिती समजताच ग्रामस्थ जमले आणि त्यांनी आरोपीचा एन्काऊंटर करा अशी मागणी करत संताप व्यक्त केला.
 
तेजस गणेश पडवळ (३० रा.वरसे याने ३० डिसेंबर रोजी त्याच्या शेजारी राहणार्‍या ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले. ही मुलगी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घरासमोरील रस्त्यावर सायकल चालवत असताना घरात पत्नी नसल्याचा फायदा उठवत, या मुलीला घरात बोलावले आणि घरचा दरवाजा बंद करून तिच्याशी गैरकृत्य केले. ही बाब कोणाला सांगितलेस तर तू व तुझी दोघेही मराल, असे धमकावून घरी पाठवून दिले.
 
त्याने दोन-चार असे घाणेरडे कृत्य केल्याने, पीडित मुलीने घडलेला प्रकार आपल्या काकीला सांगितला.तदनंतर या घटनेची माहिती पीडित मुलीच्या आई-वडिलांना देत, याबाबत तेजस व त्याच्या भावाला जाब विचारण्यात आला. तेव्हा त्याने मुलीच्या आई, बाबा, काका व काकींना शिवीगाळ करून मारहाण केली. या घटनेची देण्यासाठी पोलीस ठाण्यात जात असताना तेजस गणेश पडवळ, अनुप गणेश पडवळ, दैनिक गणेश पडवळ यांनी दुचाकीवरून पाठीमागून येऊन त्यांच्या गाडीसमोर गाड्या उभ्या केल्या.
 
त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जाऊ नये म्हणून अनुप पडवळ याने फाईट मारून गाडीची काच फोडली व पीडित मुलीच्या वडिलांना व काकांना मारहाण केली. या घटनेत नारायण पडवळ, नारायण कानू पडवळ व जितेंद्र कानू पडवळ हे तिघेजण जखमी झाले आहेत. पीडित मुलीच्या आईने रोहा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी तेजस पडवळ, अनुप पडवळ व दैनिक पडवळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. या घटनेनंतर वरसे गावात तणावाचे वातावरण पसरले आहे. तेजस हा पद्धतीने नेहमी वागत असल्यामुळे त्याचा एन्कांउंटर करून या विकृतीला ठेचून काढा, अशी मागणी संतप्त महिलांनी पोलीस अधीक्षकांना समोर केली.
खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविणार
बुधवारी (८ जानेवारी) जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पीडित मुलीच्या कुटुंबियांची वरसे येथील निवास्थानी जाऊन भेट घेऊन घडलेल्या घटनेविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली व कुटुंबियांना धीर दिला. सदर घटना निंदनीय असून तुम्ही विचलित होऊ नका.
 
या घटनेतीला आरोपीना कठोर शिक्षा व्हावी याकरिता सर्व साक्षी पुरावे गोळा करून न्यायालयात तातडीने दोषारोप पत्र दाखल करून सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात येईल आणि आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा होईल अशा पद्धतीने पोलीस प्रशासन गतिमान पद्धतीने करणार, असे त्यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0