कर्नाळा खिंडीत महाभीषण अपघात; चालकाचा मृत्यू

10 Feb 2025 13:55:39
 panvel
 
पनवेल | ठाण्यावरुन वडखळकडे जाणार्‍या एका कारला भरधाव वेगात जाणार्‍या कंटेनरने जोरदार धडक दिली. या धडकेमुळे कारवर पलटी झाली. या अपघातात गाडीच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला असून, गाडीची मालक महिला गंभीर जखमी आहे. पल्लवी जोशी या ठाण्यावरुन वडखळला जात होत्या.
 
त्या कर्नाळा खिंडीत आल्या असता भरधाव कंटेनरने गाडीला जोरदार धडक दिली. यात कार पलटी होऊन अक्षरशः चक्काचूर झाली. या अपघातात कारमधील चालक जगदीश हाजरा यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
 
पल्लवी जोशी या गंभीररित्या जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत जखमींना गाडीबाहेर काढले. हायड्राच्या सहाय्याने गाडीवर पलटी झालेला कंटेनर बाजूला काढला.
Powered By Sangraha 9.0