तळा | आयुष्यभर काबाडकष्ट करुन मुलांना वाढवल्यानंतर, अशी अनेक अभागी मुलं आहेत ज्यांना आपल्या वृध्द आई- वडीलांची अडचण वाटू लागते. वृध्दाश्रमांमध्ये वाढत असलेली गर्दी हेच दर्शवते आहे. मात्र तळा पुसाटीवाडी येथील पांडुरंग आणि सहदेव महाडीक या दोन मुलांनी त्यांच्या माता-पित्यांचे उभारलेले शिल्प प्रेरणादायी ठरत आहे.
आकाश शिंदे याने हे अप्रतिम शिल्पसाकारले आहे. या कलाकृतीत महाडीक यांच्या आई-वडिलांचा संपूर्ण जीवनाचा प्रवास रेखाटण्यात आला असून या शिल्पाला "संसार” असे नाव देण्यात आले आहे. पांडुरंग महाडीक यांचे वडील मुंबईत गिरगावात रहायचे. आई गावी शेती करुन घरचा उदरनिर्वाह चालवत असे. आई वडिलांचा प्रामाणिकपणा, कष्ट करण्याची तयारी, यामुळे आमच्यासारखी खेड्यातील मुलांवर विश्वास ठेवला गेला.
आज तळा तालुक्यात परम फ ुड्स अॅड बेवरेजेस या फील्टर वॉटर उत्पादन करणार्या माझ्या कंपनीला मोठे यश प्राप्त झाले, असे पांडुरंग महाडीक सांगतात. माझ्या आई-वडिलांमुळे हे मी करू शकलो. त्यांच्या आठवणी जीवंत रहाव्यात, त्यांनी आमच्यासाठी केलेले कष्ट डोळ्यासमोर रहावेत, म्हणून त्यांचे संयुक्त शिल्प मी उभारले आहे, असे ते सांगतात. ‘जगणं पोरक झालं की आईचं महत्व कळतं आणि पाठीवरती हात ठेवून लढ म्हणायला कोणी नसलं की बापाचं महत्व कळतं’ हे जरी खरं असलं तरी जन्मदात्या आई वडीलांची स्मृती कायम तेवत ठेवणे प्रत्येक पुत्राचे कर्तव्य आहे, असा संदेश या माध्यमातून प्रेरणादायी ठरत आहे....