अलिबाग | मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या १०० कलमी कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील एक लाख अंगणवाड्यांमधील सेविका व मदतनीस यांची सुमारे १० हजार रिक्त पदे भरली जाणार आहेत. यामध्ये रायगड जिल्ह्यातील १६ प्रकल्पांमध्ये अंगणवाडी सेविकेची २५५ तर मदतनीसची ५५६ पदे भरतीला एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाने मान्यता दिली आहे.
२१ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार असून, जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी भरती प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड व महिला व बालविकास अधिकारी निर्मला कुचिक यांनी केले आहे. जिल्ह्यातील अलिबाग प्रकल्पाअंतर्गत २९ सेविका व ३२ मदतनीस, कर्जत १ प्रकल्पाअंतर्गत १८ सेविका व ३३ मदतनीस, कर्जत २ अंतर्गत १३ सेविका व ४० मदतनीस, खालापूर १७ सेविका व ४० मदतनीस, महाड २३ सेविका व ८२ मदतनीस, माणगाव ७ सेविका ५७, मदतनीस, तळा ६ सेविका, १७ मदतनीस, म्हसळा ६ सेविका व ९ मदतनीस, मुरुड ३ सेविका, ४ मदतनीस, पनवेल ३२ सेविका व ६१ मदतनीस, पेण ३७ सेविका व ५३ मदतनीस, रोहा २१ सेविका व ५२ मदतनीस, पोलादपूर ६ सेविका व १९ मदतनीस, श्रीवर्धन ५ सेविका व १५ मदतनीस, सुधागड २२ सेविका व २७ मदतनीस आणि उरण १० सेविका व १५ मदतनीस, अशी भरती होणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या १०० कलमी कार्यक्रमाअंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाने अंगणवाड्यांमधील सेविका व मदतनीस पदे भरतीस मान्यता दिली आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील रिक्त पदांची भरती २० मार्चपूर्वी केली जाणार आहे. पात्र लाभार्थ्यांना २१ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहेत.
अंगणवाडी सेविका पात्रता
* अर्जाची अंतिम तारीख : २१ फेब्रुवारी
* वयोमर्यादा: १८ ते ३५ वर्षे (विधवा महिलांसाठी कमाल ४० वर्षे)
* शैक्षणिक पात्रता: बारावी उत्तीर्ण
* रहिवासी अट : उमेदवार स्थानिक महसुली
गावचा रहिवासी असणे आव्यश्यक.