पोलादपूर | नगरपंचायत पोलादपूरचे उपनगराध्यक्ष नागेश पवार यांच्या राजीनाम्याने रिक्त राहिलेल्या पदासाठी प्रसाद इंगवले यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने उपनगराध्यक्षपदासह ‘फिक्स’ झाले आहे. सोमवारी या निवडीची केवळ औपचारिकता बाकी राहिली आहे.
याआधी जानेवारीत विविध विषय समितीच्या निवडी करण्यात आल्या आहेत. गुरुवारी पोलादपुरच्या उपनगराध्यक्षपदासाठी सभापती प्रसाद इंगवले यांचा एकमेव उमेदवारी अर्ज मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्याकडे दाखल करण्यात आला आहे. यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख चंद्रकांत कळंबे, तालुकाप्रमुख निलेश अहिरे, शहरप्रमुख व स्विकृत नगरसेवक सुरेश पवार, प्रकाशअण्णा गायकवाड, नगरसेविका स्नेहल मेहता, शिल्पा दरेकर, महिला बालकल्याण सभापती सुनिता पार्टे यांच्या पस्थितीत अर्ज दाखल केला. प्रसाद इंगवले यांचा एकमेव अर्ज असल्यामुळे सोमवारी या निवडीची केवळ औपचारिकता बाकी राहिली आहे.