अलिबाग येथील शिक्षकाची अटल सेतूवरून उडी , वैभव पिंगळे असे शिक्षकाचे नाव; शोध सुरु

15 Feb 2025 18:55:17
 uran
 
उरण | अलिबाग येथील एका ५० वर्षीय शिक्षकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या शिक्षकाने अटल सेतूवरुन समुद्रात उडी घेतल्याची धक्कादायक घडली आहे. वैभव पिंगळे असे शिक्षकाचे नाव असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. वैभव पिंगळे हे शुक्रवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास चारचाकी घेऊन अटल सेतूवर आले होते.
 
सेतूवर असताना मध्येच गाडी थांबवून त्यांनी अटल सेतूवरुन उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सध्या पोलीस वैभव यांचा शोध घेत आहे. वैभव हे अलिबाग तालुक्यातील शिवाजीनगर कुर्डुस येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. वैभव यांनी असे का केले?
 
याबाबत माहिती उपलब्ध झालेली नाही. २०२४ साली असाच एक आत्महत्येचा प्रकार घडला होता. मुंबईवरुन नवी मुंबईच्या दिशेने येणार्‍या रस्त्यावर अटल सेतूवरुन उडी मारून आत्महत्येचा करण्याचा प्रयत्न केला. त्या ५६ वर्षीय महिलेला वाचविण्यात पोलिसांना यश आले होते. मी आत्महत्या करत नव्हते तर देवांचे फोटो समुद्रात सोडत होते, असे त्या महिलेने सांगितले होते.
Powered By Sangraha 9.0