ऐरोली येथे अतिक्रमण विरोधात धडक कारवाइ

15 Feb 2025 18:46:34
 new mumbai
 
नवी मुंबई | नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्यावतीने नोटीस देऊनही संबंधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामांविरोधात नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्दे शानुसार व अतिरिक्त आयुक्त डॉ.राहुल गेठे व उपायुक्त (अतिक्रमण) भागवत डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने ऐरोली विभागात निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
 
ऐरोली कार्यक्षेत्रातील सेक्टर ३ येथील गामी जनरल स्टोअर्स, गाळा नं. ऐ-३३, ऐरोली येथील वाढीव बांधकाम नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे केलेले होते. सदर अनधिकृत बांधकाम अतिक्रमण मोहिम राबवून सदर बांधकाम अंशत: निष्कासित करण्यात आले आहे. या धडक मोहिमेसाठी मोहिमेकरीता जी विभाग ऐरोली सहा. आयुक्त डॉ. अंकुश जाधव, कनिष्ठ अभियंता संदीप म्हात्रे व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
 
 
Powered By Sangraha 9.0