नवीन पनवेल | २८ वर्षीय तरुणाला बोलण्यात गुंतवून एटीएम कार्ड बदली केले आणि एटीएमद्वारे १८ हजार ५०० रक्कम काढून घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी दोन अनोळखी इसमाविरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पिंट्या मणी यादव हा रोडपाली गाव, कळंबोली या ठिकाणी राहत असून तो एसबीआय बँकेच्या खात्यातून पैसे काढण्यासाठी एसबीआय चौक कळंबोली बँकेच्या एटीएममध्ये गेला.
यावेळी पैसे काढत असताना दोन इसम एटीएममध्ये आले. यावेळी लवकर करा आम्हाला पैसे काढायचे असे त्यांनी सांगितले व एटीएम कार्ड काढण्यास सांगितले. त्याने एटीएम काढले असता दुसरे इस्माने त्याची एटीएम हातात घेतले आणि मी पैसे काढून देतो असे बोलला.
यावेळी यादव याला बोलण्यात गुंतवून त्यांनी एटीएम कार्ड बदली केले आणि दुसरा एटीएम कार्ड मशीन मध्ये घातला. पासवर्ड टाकल्यानंतर पैसे निघाले नाहीत. त्यानंतर ते दोन्ही ईसम त्या ठिकाणाहून निघून गेले. काही वेळाने बँक खात्यातून दोन वेळा पैसे काढण्याचा मेसेज यादव याना आला. यावेळी १८ हजार ५०० काढलेल्या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.