माजी सैनिकांसाठी पोलादपूर येथे भव्य मेळावा

18 Feb 2025 16:01:02
 poladpur
 
पोलादपूर | तालुक्यामधील माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, युध्द विधवा, वीर पत्नी, वीर माता, वीर पिता यांच्याकरिता शुक्रवार, २१ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता कॅप्टन विनायक मोरे हॉल पोलादपूर येथे सैनिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
 
या मेळाव्यास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल राहुल वैजनाथ माने (नि.) यांनी केले आहे.
 
या मेळाव्यात जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचा विविध आर्थिक मदती, माजी सैनिक महिला बचत गट स्थापन करणे, माजी सैनिकांना रोजगार विषयक माहीती तसेच जिल्हा उद्योग केंद्र, अलिबाग यांच्याकडून नाबार्डमार्फत राबविल्या जाणार्‍या विविध योजनांची माहीती देण्यात येणार आहे. या मेळाव्याला जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0