कोलाड | रोहा तालुयात बाहे गाव हे भाजीपाला उत्पादनासाठी प्रसिद्ध गाव आहे गावातील असंख्य शेतकरी अनेक वर्षांपासून उन्हाळ्यात भाजीपाला व्यवसाय करीत आहेत. एवढेच नाही तर १९८९ च्या पुरामुळे गावाचे पुनर्वसन झाले यामुळे आपल्या शेतीपासून येथील गावकर्यांना दूर रहावे लागले परंतु तरीही येथील शेतकर्यांनी कधीही हार मानली नाही.
उन्हाळी शेतावर झोपडी बांधून भाजीपाला व्यवसाय सुरु ठेवला आहे. परंतु बाहे येथील शेतकरी जगदीश थिटे यांनी भाजीपाला पीक सोडून यावर्षी कलिंगड यांचे पिक घेण्याचे ठरविले. सर्व मेहनत करुन कलिंगड याचे पीक उत्तम प्रकारे आले आहे कलिंगडचे फळही मोठे झाले आहे.
शिवाय कलर लालसर व त्याची चव अतिशय गोड असल्यामुळे या कलिंगडाला परदेशातून मागणी आल्यामुळे ही कलिंगडे परदेशात रवाना झाली आहेत. यामुळे शेतकरी जगदीश थिटे यांनी केलेली मेहनत कामी आली असुन त्यांना या कलिंगड पिकापासून फायदा होणार असल्याचे दिसून येत आहे.