यंदाच्या अर्थसंकल्पाला स्थानिक स्तरापासून आंतरराष्ट्रीय स्तराची पोर्शभूमी आहे

18 Feb 2025 17:54:59
alibag
 
अलिबाग | भारताच्य अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी भारताचा २०२५ - २०२६ या आर्थिक वर्षाचा जो अर्थसंकल्प मांडला आहे, त्यात भविष्याची बाजू आहे. या अर्थसंकल्पाला स्थानिक स्तरापासून आंतरराष्ट्रीय स्तराची पोर्शभूमी आहे,, असे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी व्यक्त केले.
 
अलिबाग असोसिएट्स आणि मोनोटिनिक यांच्यातर्फे शनिवारी (दि.१५) अलिबाग येथील भाग्यलक्ष्मी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या अर्थसंकल्पावरील व्याख्यानात चंद्रशेखर टिळक बोलत होते. भारत भविष्यात शस्त्रास्त्र निर्माण करणारा देश होणार आहे. त्यामुळे संरक्षण क्षेत्रात गुंतवणुकीला मोठा वाव आहे.
 
त्याचबरोबर मेडिकल टुरिझम, रिलीजन टुरिझम व कृत्रिम बुध्दिमत्ता या क्षेत्रातदेखील आपल्या देशात भविष्यात चांगले दिवस येणार आहेत. त्यामुळे या क्षेत्रात गुंतवणूक केल्यास चागंला फायदा होऊ शकतो. योग्य अभ्यास करूनच गुंवणूक करा. कमी कालावधीत दुप्पट पैसे देतो असे सांगणार्‍यांवर विेशास ठेवू नका, असा असल्ला चंद्रशेखर टिळक यांनी दिला.
 
भारतात सध्या जुनी करप्रणाली व नवीन करप्रणाली आहे. ज्या कर सवलती केंद्र सरकारने या अर्थसंकल्पात दिल्या आहेत, त्या नवीन करप्रणालीमधून मिळणार आहे. त्यामुळे भविष्यात नवीन करप्रणालीच सुरु राहणार, हे या अर्थसंकल्पावरुन दिसते, असे टिळक म्हणाले.
 
 
Powered By Sangraha 9.0