उरणः शिवजयंतीदिनी मास्टर मरीन कामगारांना पगारवाढ

21 Feb 2025 19:22:44
 uran
 
उरण | एप्रिल २०२४ पासून प्रलंबित असलेल्या मास्टर मरीन सर्व्हिसेस या कंपनीतील सर्वेअर कामगारांचा पगारवाढीचा करार छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या जयंतीच्या दिवशी कामगार नेते महेंद्र घरत यांच्या उलवे येथील कार्यालयात संपन्न झाला. केंद्रासरकारच्या अडमुठ्या धोरणांमुळे एकीकडे मालकांना कंपनी चालवीने मुश्किल होत चाललं असतांना दुसरीकडे कामगार संघटनांना कामगारांचे हक्क अबाधित ठेवतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
 
कामगार नेते महेंद्र घरत हे या दोघांची योग्य सांगड घालत कामगारांना न्याय देण्यात यश्यस्वी होताना दिसत आहेत. या करारनाम्यानुसार कामगारांना ४ हजार ५०० रुपये पगारवाढ, ३ लाख रुपयांची मेडिलेम पॉलिसी, कामगार कायद्यानुसार बोनस, १ हजार ५०० रुपये प्रत्येकी एलटीए देण्याचे मान्य करण्यात आले आहे. या करारनाम्या प्रसंगी न्यू मॅरिटाईम अ‍ॅड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष महेंद्र घरत, कार्याध्यक्ष पी. के. रमण, सरचिटणीस वैभव पाटील, आदी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0