चर्मकार समाज प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी आत्माराम नांदगावकर

26 Feb 2025 17:32:29
 korlie
 
कोर्लई | मुरुड तालुका चर्मकार समाज प्रतिष्ठानच्या तालुका अध्यक्षपदी आत्माराम महादेव नांदगावकर यांची निवड करण्यात आल्याबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे. २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता मनन गेस्ट हाऊस काशीद येथे समाज बांधवांची सभा घेण्यात आली.
 
त्या सभेमध्ये एकमताने आत्माराम नांदगावकर यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी राजू म्हशीलकर, खजिनदार रमेश पेणकर, सचिव कृष्णा वाडेकर, सहसचिव पंकज पेणकर यांची व माजी अध्यक्ष सुरेश नांदगावकर, माजी सेक्रेटरी गणेश नागोठणेकर यांची सल्लागार पदी निवड करण्यात आली. यावेळी प्रणय धोंडसेकर, खेमराज नांदगावकर, दिलीप रोहेकर, संदीप मुरुडकर यांची संघटकपदी निवड करण्यात आली.
 
सभेसाठी नितीन पुगावकर राकेश मुरुडकर आदी. मान्यवरांसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुका संघटनेचे माजी अध्यक्ष सुरेश नांदगावकर, माजी सचिव गणेश नागोठणेकर यांनी नवनियुक्त अध्यक्ष व सर्व कार्यकारणी सदस्यांचे पुष्प देऊन स्वागत केले.
 
सुरेश नांदगावकर यांनी आपल्या मनोगतात त्यांनी आपल्याकडून आपल्याला समाजाचे ऋण फेडण्याकरिता आपली नियुक्ती करण्यात आलेली आहे. आपल्याकडून समाजपयोगी भरीव कार्य व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, त्याचप्रमाणे कार्यकारिणीच्या सदस्यांनी आपापले मनोगत व्यक्त केले.
 
 
Powered By Sangraha 9.0