पेण | १५ वर्षाच्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून व व्हिडिओ व्हायरल करेन, अशी धमकी देऊन लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तरुणाविरोधात पेण पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनिष नरेंद्र म्हात्रे असे या तरुणाचे नाव आहे. पिडीत मुलगी आणि मनिष यांची स्नॅप चॅटवरुन मे २०२४ मध्ये ओळख झाली.
त्यावर ते एकमेकांशी बोलू लागले. ऑगस्ट २०२४ मध्ये मनिष याने पिडीत मुलीला तु मला आवडतेस मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे. असं बोलून त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. नंतर सायन्स विषयाच्या नोटस्? वरुन ते साई मंदिर पेण येथे भेटले. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात मनिष याने आपल्या चिंचपाडा येथील श्री शिवाली गृहनिर्माण संस्था येथील घरी बोलावून तिच्या इच्छेविरुध्द तिच्यावर अत्याचार केला.
त्यानंतर तिला तु कोणाला सांगितलास तर तुझा व्हिडिओ व्हायलर करीन अशी धमकी दिली. त्यानंतर अनेकदा त्याने तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलीच्या वडिलांना ही बाब माहिती झाल्यानंतर, ही बाब उघडकीस आली. पेण पोलिसांनी याप्रकरणी मनिष म्हात्रे याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर पोक्सोंतर्गत नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला २८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.