मुरुड | मुरुड शहरातील भोगेश्वर पाखाडी परिसरात एकाच रात्री दहा घरांचे लॉक तोडून चोरी करण्यात आली. घरांचे मालक बाहेर असल्याने या घरातून नेमका कितीचा ऐवज लंपास आहे? याची माहिती समजू शकलेली नाही. या घटनेने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
भोगेश्वर पाखाडी परिसरातील मुरुड पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली आहे. तातडीने फिंगर प्रिंट्स विभागास आमंत्रित करण्यात आले आहे. अचानकपणे असा प्रकार घडल्याने येथील सर्व नागरिकांनी भीती व्यक्त केली आहे. मुरुड पोलीस ठाण्यात अद्यापर्यंत कोणीही तक्रार दाखल केली नसली तरी पोलीस तपास करीत आहेत.
प्रत्यक्ष घराचे मालक आल्यावरच किती रकमेचा ऐवज गायब झाला आहे, ते कळणार आहे. एकाच पाखाडीमध्ये दहा घरांचे लॉक तोडण्याची घटना घडल्याने मुरुड शहरातील नागरिक भयग्रस्त झाले आहेत.