मुंबई | अभिनेता सलमान खान याला मारण्याच्या उद्देशाने त्याच्या पनवेलस्थित फार्महाऊसची रेकी करणार्या दोन आरोपींना शुक्रवारी (७ फेब्रुवारी) जामीन मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडून हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. वास्पी महमूद खान उर्फ वसीम चिकना आणि गौरव भाटिया उर्फ संदीप बिश्नोई असं या प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
जून २०२४ मधील हे प्रकरण आहे. सलमान खानला मारण्याच्या उद्देशाने त्याच्या घराची रेकी केल्याचा आरोप या दोघांवर आहे. मात्र त्यांच्याविरोधात कोणतेही ठोस पुरावे नसल्याचे म्हणत न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. आज या प्रकरणात न्यायालयात सुनावणी पार पडली.