खोपोली येथील केमिकल कंपनीलाआग; 3 जखमी

By Raigad Times    10-Mar-2025
Total Views |
khopoli
 
खोपोली।खोपोलीतील इंडियन इन्व्होथिंक कंपनीला भीषण आग लागल्याची घटना रविवारी (9 मार्च) घडली. या आगीत कंपनीचा एक अधिकारी गंभीर जखमी झाला आहे तर अन्य दोनजण किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. मुंबई पुणे जुना महामार्गालगतच मूळगांव हद्दीत इंडियन इन्व्होथिंक कंपनी (जुने नाव-आयओसी) कंपनी आहे.
 
कंपनीतयाआधीही अपघात घडले आहे. रविवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कंपनीतील टीटी-1 प्लँटमधील रिअ‍ॅक्टरगरम झाल्यामुळे आग लागली. आग लागल्यानंतर खोपोली पोलिसांसह, ‘अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी’ आपत्कालीन संघटना तातडीने मदतीला धावून आली. सायंकाळी आग नियंत्रणात आली आहे.
 
दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या प्रितम तिहारे (वय 38) यांना ऐरोली येथील बर्न रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ही कंपनी ही जुनी व प्रसिद्ध कंपनी आहे. मात्र कंपनीत स्वतःची रुग्णवाहिका आणि अग्निशमन वाहन नसल्याने संताप व्यक्त होत आहे.